रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले. या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाणार असून संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
