Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देऊन भगवान...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देऊन भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला तसेच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

Chief Minister Devendra Fadnavis visited the Dragon Palace Temple in Kamathi and paid homage to the idol of Lord Gautam Buddha as well as the great man, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and participated in the Buddha Vandana.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल आता आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट द्यायची इच्छा असते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version