या स्पर्धेच्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाची #सायकलस्पर्धा आयोजित होत आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा युक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
