Home नंदुरबार जिल्हा आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

0
District Collector Dr. Mittali Sethi reviewed the pending complaints on the 'Aaple Sarkar' portal.

नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींच्या अनुषंगाने साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीदरम्यान विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.

तक्रारींचा विहित कालमर्यादेत निपटारा न झाल्याबाबत संबंधित विभागप्रमुखांची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली.

मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित असलेल्या विभागप्रमुखांना दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रलंबित तक्रारींचे तातडीने परीक्षण करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, तसेच पात्र तक्रारींचा त्वरित निर्णय घेऊन त्याची नोंद आपले सरकार पोर्टलवर अद्ययावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिले.

सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाकडील प्रलंबित तक्रारींचा नियमित आढावा घेऊन त्या विहित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.