Home आरोग्य 18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर,05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया

18 ऑगस्टला मोफत मणक्याचे आजार तपासणी शिबीर,05 सप्टेंबरला होणार मोफत शस्त्रक्रिया

0
Free spinal disorder screening camp on August 18; free surgeries to be performed on September 5.

नंदुरबार(प्रतिनिधी):-जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ‘द स्पाइन फाउंडेशन, मुंबई’, डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार आणि लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. हे शिबीर मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार बाह्यरुग्ण विभागात  पार पडणार आहे.
5 सप्टेंबर रोजी होणार मोफत शस्त्रक्रिया,
शिबीरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची प्राथमिक व सखोल तपासणी केली जाईल. तपासणीनंतर ज्या रुग्णांना मणक्याच्या शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) आवश्यकता भासेल, अशा गरजू रुग्णांवर 05 सप्टेंबर 2026 रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रुग्णांसाठी महत्त्वाच्या सूचना व आवश्यक कागदपत्रे:, वैद्यकीय कागदपत्रे: रुग्णांनी तपासणीसाठी येताना पूर्वीच्या उपचाराच्या सर्व फायली, कागदपत्रे आणि उपलब्ध असल्यास एम. आर.आय. (MRI) अहवाल सोबत आणणे आवश्यक आहे. मोफत उपचार योजना: मणक्याच्या शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांवर ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. यासाठी रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आयुष्मान कार्ड सोबत आणावे. पूर्व नोंदणी व संपर्क: शिबीराच्या पूर्व नोंदणीसाठी मोबाईल 7350779142 यावर संपर्क साधावा.
नंदुरबार जिल्हा व परिसरातील मणक्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या सर्व गरजू रुग्णांनी वेळेवर उपस्थित राहून या मोफत वैद्यकीय शिबीराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.