Home नंदुरबार जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, विकास...

पालकमंत्री हसन मुश्रीफ 14 व 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, विकास योजनांचा आढावा, भूमिपूजन व जिल्हा नियोजन समितीची बैठक, स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास राहणार

1
Guardian Minister Hasan Mushrif will visit Nandurbar district on August 14 and 15; his itinerary includes reviewing development schemes, performing groundbreaking ceremonies, attending the District Planning Committee meeting, and participating in the main official flag-hoisting ceremony on Independence Day.

नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, 14 व शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6.20 वाजता ते मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस येथून शताब्दी एक्सप्रेसने सुरतकडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वाजता सुरत रेल्वे टर्मिनस येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने नवापूरकडे रवाना होतील. सकाळी 11 वाजता नवापूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होईल.
सकाळी 11.30 वाजता नवापूर येथील शेठ एच. जे. शहा कनिष्ठ महाविद्यालयात मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांची तालुकास्तरीय आढावा बैठक होईल. दुपारी 2.30 वाजता ते नवापूर येथून कोंडाईबारी-ब्राह्मणवेल-छडवेल मार्गे नंदुरबारकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता नंदुरबार येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल व्हीसी रूममध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता नियोजन भवनातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता मुश्रीफ हे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत नियोजन भवनातील कॉन्फरन्स हॉल येथे बैठक घेतील. सायंकाळी 6.30 वाजता नियोजन भवनात नागरिकांच्या गाठीभेटी घेतील. त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, नंदुरबार येथे त्यांचे आगमन व मुक्काम असेल.
शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ व इतर कार्यक्रमांना मुश्रीफ उपस्थित राहतील. सकाळी 10.30 वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातून छडवेल-ब्राह्मणवेल-कोंडाईबारी मार्गे सुरत विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता सुरत विमानतळावर आगमन झाल्यानंतर दुपारी 3.20 वाजता विमानाने गोव्याकडे प्रयाण करतील.