Home पर्यटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग...

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली

1
Fisheries and Ports Minister Nitesh Rane met Union Minister for Ports, Shipping and Waterways Sarbananda Sonowal.

महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, सागरमाला २.० अंतर्गत राज्याने प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी मंत्री श्री. राणे यांनी विशेष पाठपुरावा करत केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भातील पत्र दिले.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सरकारने सागरमाला २.० कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, हे प्रकल्प राज्यातील बंदराधारित विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. या माध्यमातून बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल, मत्स्य बंदरांचे आधुनिकीकरण होईल, किनारी भागातील पायाभूत सुविधा उन्नत होतील तसेच किनारी जलवाहतूक, अंतर्गत जलमार्ग आणि सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. याशिवाय या प्रकल्पांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही मंत्री श्री. राणे यांनी व्यक्त केला आहे.