(नंदुरबार) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दिनांक 17 जुलै 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 16 जुलै, 2026 रोजी रात्री 11.30 वाजता मुंबईतील विशाळगड या शासकीय निवासस्थानावरून दादर रेल्वे टर्मिनसकडे प्रयाण. रात्री 12.15 वाजता दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते नंदुरबारकडे प्रयाण.
शुक्रवार, दिनांक 17 जुलै, 2026 रोजी सकाळी 08.25 वाजता नंदुरबार रेल्वे स्टेशनवर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 08.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल व्हीसी रूम येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यमान आढावा, पेरणीबाबत सद्यस्थिती, बियाणे, खते व इतर समस्यांबाबत चर्चा. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत बैठक. सकाळी 11.00 ते 12.00 या वेळत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये महिला व बाल रुग्णालय येथील SNCU (Special New Born Care Unit) आणि मिल्क बँक (दुग्धपेढी). तसेच क्षयरोग अतिदक्षता कक्ष आणि बालरोग अतिदक्षता कक्ष (PICU) यासह इतर ऑनलाईन उद्घाटने.
दुपारी 12.00 ते 12.30 या वेळेत जिल्हा रुग्णालय सभागृहात जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, जिल्हा संनियंत्रण व सल्लागार समिती, आणि जिल्हा पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समितीच्या बैठका पार पडतील. दुपारी 12.40 वाजता लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “सेवा सप्ताह” कार्यक्रमांतर्गत धुळे रोडवरील संजय टाऊन हॉल येथे बुथ कार्यकर्ता (BLA) मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 01.30 ते 2.30 राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबारवरून प्रकाशा (ता. शहादा) कडे रवाना होतील. दुपारी 3.30 वाजता प्रकाशा येथे आगमन झाल्यानंतर ते श्री. केदारेश्वर देवस्थानचे दर्शन घेतील व प्रकाशा तीर्थक्षेत्र स्थळाची पाहणी करतील. दुपारी 4.30 वाजता शहादा तहसील कार्यालयात शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांची तालुकास्तरीय आढावा बैठक ते घेतील. सायंकाळी 6.00 ते 6.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह शहादा येथे राखीव-नागरिकांच्या गाठीभेटी. रात्री 08.55 वाजता नंदुरबार रेल्वे टर्मिनसवरून दादर-भुसावळ एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील.
