रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी
0
Holiday for all schools, colleges and anganwadis in Nandurbar district on August 1 in view of red alert
भारतीय हवामान विभागाने (IMD) नंदुरबार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी शाळा, महाविद्यालये तसेच सर्व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थी, शिक्षक व पालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी-नाले, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.