
अक्राणी येथे आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्र विकास, रोजगार हमी योजना आणि निधी नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयात्मक पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.
बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत मजुरी समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नरेगा अंतर्गत अनुज्ञेय नसलेल्या कामांसाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) किंवा इतर उपलब्ध निधीतून कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विकासकामांना आर्थिक अडचणींमुळे विलंब होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
संबंधित सामुदायिक वनहक्क (CFR) समितीकडून पुढील दोन दिवसांत अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, अंदाजे १००० हेक्टर क्षेत्र विकासाच्या निकषांनुसार कामांची मागणी प्रस्तावित करण्यात येणार आहे. वनसंवर्धन, वृक्षलागवड, जलसंधारण आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी या प्रस्तावाला महत्त्व दिले जात आहे.
बैठकीत रोजगार हमी योजना विभागाला आगामी ६ जूनपर्यंत मस्टर काढून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांना वेग मिळणार आहे.
यावेळी ‘बिहार पॅटर्न’नुसार कामांची अंमलबजावणी करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली. सामुदायिक सहभाग, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत विकास या तत्त्वांवर आधारित मॉडेलद्वारे वनक्षेत्र संवर्धनासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
#नंदुरबार#अक्राणी#CFR#वनहक्क#MGNREGA#रोजगारहमी#प्रोजेक्टहरियाली#वृक्षलागवड#जलसंधारण#शाश्वतविकास#जिल्हाप्रशासन#डॉमित्तालीसेठी#ForestRights#HaritNandurbar