Home महाराष्ट्र आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ पुस्तकाचे प्रकाशन

आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ पुस्तकाचे प्रकाशन

R. G. Rajan's book 'Management Musings' released

नवी दिल्ली: खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि व्यवस्थापन अभ्यासक श्री. आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ या पुस्तकाचे प्रकाशन हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. सुमेधा कटारिया यांच्या हस्ते येथे करण्यात आले.

नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक श्री. हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त श्री. नितीन शेंडे आणि जनसंपर्क अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे, श्रीमती मालती राजगोपालन आदी उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक श्री. राजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि आपल्या कॉर्पोरेट प्रवासातील अनुभव सांगताना अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. खते- रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील आपल्या ४५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाबाबतही माहिती दिली.

या पुस्तकात नेतृत्वगुण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स (संस्थात्मक सुशासन), व्यावसायिक नीतिमत्ता आणि शाश्वत विकास या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. केवळ तांत्रिक किंवा वित्तीय यश हेच कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचे मोजमाप असू शकत नाही. उत्तम चारित्र्य, कामातील सचोटी आणि लोककेंद्री नेतृत्व हेच दीर्घकालीन संस्थात्मक यशाचे खरे गमक आहे,असे श्री. राजन यांनी यावेळी संवाद साधताना स्पष्ट केले.

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष-126/ दि.29.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

error: Content is protected !!
Exit mobile version