Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान’ – प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत KCC पोहोचवण्याचा...

नंदुरबार जिल्ह्यात ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान’ – प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत KCC पोहोचवण्याचा निर्धार

‘Kisan Credit Card (KCC) Campaign’ in Nandurbar district – Determination to reach KCC to every farmer

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ व जलद कृषी कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या पुढाकाराने ‘प्रत्येक शेतकऱ्यासाठी KCC’ ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन योजनेच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

बैठकीस नंदकुमार पैठणकर (मुख्य व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक), रविंद्र मोरे (जिल्हा विकास अधिकारी, नाबार्ड), दीपक पटेल (निदेशक, ATMA) तसेच विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

जिल्ह्यातील KCC स्थिती – अजूनही हजारो शेतकरी वंचित:

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 2 लाख शेतकरी असून केवळ 70,000 शेतकऱ्यांकडे KCC आहे — म्हणजेच केवळ 45% कव्हरेज. अंदाजे 1 लाख शेतकरी आणि 27,000 IFR लाभार्थी अजूनही योजनेपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर भांडवली कर्ज मिळावे व पीक उत्पादन वाढावे, यासाठी KCC योजनेचा वेगाने प्रसार अत्यावश्यक असल्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी बैठकीत अधोरेखित केले.

विशेष 10 KCC कॅम्प – गावोगावी सेवा:

अलीकडील DLCC बैठकीत जिल्ह्यात 10 विशेष KCC कॅम्पचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कॅम्प पंचायत समिती आणि निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित होतील. या मोहिमेत सर्व बँका, कृषी विभाग, नाबार्ड, KVK, PACS आणि CSC केंद्रांचा सहभाग असेल.

KCC कॅम्पचे वेळापत्रक (08–19 डिसेंबर 2025)

⦁ 08 डिसेंबर – मोहिदे (शहादा)

⦁ 09 डिसेंबर – विसरवाडी (नवापूर)

⦁ 10 डिसेंबर – खापर (अक्कलकुवा)

⦁ 11 डिसेंबर – धडगाव (धडगाव)

⦁ 12 डिसेंबर – रणाळा (नंदुरबार)

⦁ 15 डिसेंबर – तळोदा (तळोदा)

⦁ 16 डिसेंबर – सारंगखेडा (शहादा)

⦁ 17 डिसेंबर – खोंडामळी (नंदुरबार)

⦁ 18 डिसेंबर – चिंचपाडा (नवापूर)

⦁ 19 डिसेंबर – ब्राम्हणपुरी (शहादा)

मोहिमेची मुख्य उद्दिष्टे:

⦁ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे KCC कव्हरेज वाढवणे

⦁ कॅम्पमध्येच कागदपत्र पडताळणी, प्रक्रिया व मंजुरी उपलब्ध करणे

⦁ बँका व प्रशासनाचा एकसंध समन्वय निर्माण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत जोडणे

सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या KCC कॅम्पला भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#KCCAbhiyan#KisanCreditCard#EveryFarmerKCC#DistrictAdministration#DrMitaliSethi#NABARD#AgricultureDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version