Home नंदुरबार जिल्हा नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत भव्य ग्रासरूट कॅम्पेन – ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत भव्य ग्रासरूट कॅम्पेन – ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

Massive grassroots campaign under Nav Tejaswini programme – a significant step towards empowerment of rural women

महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार अंतर्गत सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्र, शहादा यांच्या अंतर्गत भूसत्वधारा शेतकरी उत्पादक कंपनी, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत ग्रासरूट कॅम्पेन भव्य आणि उत्साहवर्धक पद्धतीने पार पडले.

कॅम्पेनचा उद्देश:

ग्रामीण महिलांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, उपजीविकेच्या संधींबद्दल जागरूक करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्त्व समजावणे आणि स्थानिक विकास प्रक्रियेत महिलांचा आत्मविश्वास व सहभाग वाढवणे हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू होता. सदर उपक्रम मध्ये २५० महिलांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमातील ठळक मुद्दे:

स्वागत व प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

श्री. प्रशांत पाटील, जिल्हा प्रकल्प सल्लागार, माविम यांनी महिलांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना आणि त्यांचा जीवनमान सुधारण्यासाठी होणारा उपयोग यावर मार्गदर्शन केले.

श्री. शुभम अकोले, MIS व्यवस्थापक, माविम यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे योजनांचा लाभ अधिक कार्यक्षमतेने कसा मिळवता येईल हे स्पष्ट केले.

भूसत्वधारा शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यप्रणालीबद्दल सविस्तर माहिती देत कंपनीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे लाभ, बियाणे व खते उपलब्धतेची योजना, सामूहिक खरेदी-विक्री प्रणाली आणि महिलांसाठी रोजगार संधी यावर उपजीविका सल्लागारांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस फोकस ग्रुप डिस्कशन (FGD) आयोजित करण्यात आले, ज्यात महिलांनी आपल्या अपेक्षा, गरजा आणि स्थानिक अडचणींबाबत मोकळेपणाने चर्चा केली. जन शिक्षण संस्थेमार्फत महिला कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली.

विशेष उपस्थित :

⦁ श्री. प्रशांत पाटील – जिल्हा प्रकल्प सल्लागार,माविम नंदुरबार

⦁ श्री. वीरेंद्र नाईक – जिल्हा समन्वयक, जनसाहस संस्था

प्रमुख मार्गदर्शक –

⦁ श्री. शुभम अकोले – MIS,माविम,नंदुरबार

⦁ श्रीमती. प्रवीना कुवर – व्यवस्थापक, सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र,शहादा.

⦁ श्री. कालूसिंग पटले – उपजीविका सल्लागार,शहादा.

⦁ सहयोगिनी – CRP

कार्यक्रमाचे महत्त्व व निष्कर्ष:

या ग्रासरूट कॅम्पेनमुळे ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या योजनांबद्दल अधिक सखोल माहिती मिळाली आणि त्यांनी आपली उपजीविका सुधारण्यासाठी नवीन संधींची ओळख करून घेतली. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांद्वारे आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याची जाणीव झाली.

आडगाव मुबारकपूर, शिरूर, म्हसावद, ब्राह्मणपुरी, मंदाना, राणीपूर इत्यादी गावांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मतांमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध आणि प्रभावी केला.

हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणाकडे, स्वावलंबन आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

#Nandurbar#Tejaswini#WomenEmpowerment#GrassrootCampaign#MAVIM#BhusthvdharaFPC#RuralDevelopment#SelfHelpGroups#MahilaSashaktikaran

error: Content is protected !!
Exit mobile version