
कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही खाणी सुरू राहणार नाहीत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले. यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बैठक घेण्यात येईल, असे उत्तर मंत्री बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते.