(अक्कलकुवा) प्राथमिक व माध्यमिक शासकीय आश्रमशाळा भगदरी ता.अक्कलकुवा जि.नंदूरबार येथे मशरूम शेती कार्यशाळा कार्यक्रम घेण्यात आली. मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे व त्यांचा सहकाऱ्यांनी शाळेचे विद्यार्थी आणि कर्मचारीना मशरूम लागवडीचे धडे देतांना सुरवातीपासून ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यशाळेचा जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. (Mushroom farming workshop conducted at Government Ashram School Bhagdari)
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे.टी.वळवी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी उपसभापती व भगदरी गावाचे लोकनियुक्त सरपंच पिरेसिंग पाडवी यांच्यासोबतच मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे,सहकारी, भगदरी आश्रम शाळेचे शिक्षक वृंद, गमन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक के.आर.तडवी व त्यांचे शिक्षक वृंद, समाजसेवक माक्त्यादादा शाळा व्यवस्थापक समिती सदस्य बाजिरावदादा व दोन्ही शाळेचे जवळपास ७०० विद्यार्थी उपस्थित होते.
मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे व त्यांचा सहकाऱ्यांनी शाळेचे विद्यार्थी आणि कर्मचारीना मशरूम लागवडीचे धडे देतांना सुरवातीपासून ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप प्रात्यक्षिक करून दाखवले. मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी मशरूम सेवनाचे अनेक फायदे सांगितले.मशरूम एक भाजीपाला पदार्थ असल्याने शाकाहारी व मासाहारी लोकं खाऊ शकतात. मशरूम चविलाच नव्हे तर आरोग्यालाही खूप फायदेशीर आहे. मशरूम मध्ये जीवनसत्व खनिजे आणि अमिनो असिड मोठ्या प्रमाणात आहे. मशरूम सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते, शरीराच्या पेशींची दुरुस्ती, हृदयाचे आरोग्य सुधरते, मधुमेह रोगातील शुगर नियंत्रित करते, त्वचेचे आरोग्य तसेच कॅन्सर सारख्या आजारावर सुध्दा मशरूम उपायकारक व गुणकारक आहे. म्हणूनच मशरूम ला आरोग्याचे रामबाण औषध असे म्हणतात.
आपल्या भारत देशात शेक्षणीक अभ्यासक्रमात रोजगार व व्यवसाय विषयी कुठलेही शिक्षण दिले जात नाही.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यवसायाबद्दल जागृत करून, व्यवसाय करून विद्यार्थी स्वतःचे खर्च व परिवाराची आर्थिक परिस्थिती नियंत्रित करू शकतात. आजच्या युगात प्रत्येक युवा युवतींना नोकरी मिळणे शक्य नाही म्हणून आपण आपल्या शालेय जीवनापासूनच स्वतः चा पायावर उभे राहायला शिकले पाहिजे. लहान मोठे व्यवसाय केले पाहिजे, भारतात मशरूम शेती फक्त 17% केली जाते. मशरूम ची शेती करून आपण आपले भविष्य उज्वल करू शकतो. मशरूम शेतीच नव्हे तर इतर कुठलाही व्यवसाय करून आत्मनिर्भर झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणच न घेता ज्याचात उत्पादकता आहे असे शिक्षण घ्यावे. जपान,अमेरिका सारख्या विकसित देशाचे उदाहरण देऊन नोक्रीचाच मागे न लागता व्यवसायात उतरले पाहिजे असे मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. भगदरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जे.टी.वळवी यांनी नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने शासकीय आश्रमशाळा जि.प.शाळा व आरो्ग्य केंद्र,आंगनवाडी ह्या ठिकाणी मशरूम चे पोषक आहार देऊन नंदुरबार जिल्हा कुपोषण मुक्त करू या असा विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना उपदेश दिला.