(नंदुरबार) विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘अभिव्यक्ती मताची या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. (Organizing various competitions under ‘Abhavyakti Matachi’ – Collector Manisha Khatri)
या स्पर्धेत महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांचे (ART COLLEGS) विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी ०१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा आहे. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या ‘मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
जाहिरात निर्मितीसाठी
भित्तीपत्रकसाठी (पोस्टर)
घोषवाक्यसाठी
या स्पर्धेत महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.