Home महाराष्ट्र खारघर, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज...

खारघर, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली.

Rural Development Minister Jayakumar Gore inspected the government building, Gram Vikas Bhavan, constructed in Kharghar, Navi Mumbai today.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय तसेच प्रशिक्षण उपक्रमांसाठी हे संकुल महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे.यावेळी ग्रामविकास भवनातील विविध प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठी उपलब्ध सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम, प्रशिक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामविकास भवन हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!
Exit mobile version