स्पर्धा परीक्षा ही आजच्या शिक्षण क्षेत्रातील आणि विद्यार्थी जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांची ओळख, तयारी आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने तळोदा तालुक्यात शिक्षकांनी सुरू केलेला अभिनव उपक्रम — ‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ — हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, तसेच मा. शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांच्या प्रेरणेने आणि गटशिक्षणाधिकारी श्री. शेखर धनगर, विस्तार अधिकारी श्रीमती आरती शिंपी, श्री. वसंत जाधव व श्री. ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक श्री. अनिल सोनवणे आणि श्री. चेतन खैरनार विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करतात, तसेच स्पर्धा परीक्षेबद्दल आवड असलेले इतर शिक्षकही विद्यार्थ्यांना हातभार लावतात.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
सन २०२२-२३ पासून दर शनिवारी शालेय कामकाजानंतर सकाळी ११.३० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.
या वर्गांमध्ये खालील परीक्षांसाठी तयारी केली जाते –
मार्गदर्शन वर्गात घटकनिहाय सराव परीक्षा, विद्यार्थ्यांच्या त्रुटी ओळखून सुधारणा, व्हॉट्सॲप गटांद्वारे आठवडाभर अभ्यासाचे नियोजन, तसेच पालकांना घरी अभ्यास तपासणीसाठी मार्गदर्शन — अशा अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मदत दिली जाते.
उपक्रमाचे परिणाम:
सन २०२४-२५ मध्ये तळोदा तालुक्यातील ५९० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ४०.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले — हा जिल्ह्यातील सर्वोच्च निकाल आहे.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी तळोदा तालुक्याचे असून, एकूण ६९ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत.
जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले १० विद्यार्थी तळोदा तालुक्याचेच आहेत — ही या उपक्रमाची यशोगाथा दर्शवते.
या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे. गणितातील क्लिष्ट वाटणारे प्रश्न सोडवण्याच्या सोप्या पद्धती शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांची विषयावरील भीती दूर झाली आहे. सराव परीक्षांमुळे वेळ व प्रश्नसंख्या यातील ताळमेळ साधण्याची सवय लागली आहे, तर परीक्षेच्या वातावरणाशी परिचय वाढला आहे.
परिणामकारक परिवर्तन:
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड, शिष्यवृत्ती गुणवत्तायादीतील वाढ, आणि स्पर्धा परीक्षा तयारीची सवय अशा अनेक सकारात्मक घडामोडी दिसून येत आहेत.
दरवर्षीचा वाढता यशाचा आलेख, शिक्षक-पालकांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे “शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा” हा उपक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आदर्श प्रकल्प ठरला आहे.
#SaturdayIsForSuccess#SpardhaPariksha#NandurbarEducation#TalodaModel#CollectorOfficeNandurbar#MahilaShikshan#RuralEducation#MPSC#ScholarshipExam#CompetitiveExamPreparation
