महाराष्ट्र राज्यातील पिकांच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील मोहिदा (ता. शहादा) येथे सोयाबीन पिकाचा कापणी प्रयोग पार पडला. या प्रयोगाचे पर्यवेक्षण मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सी. के. ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पर्यवेक्षणाचा मुख्य उद्देश ‘क्षेत्रीय स्तरावर होणाऱ्या चुका टाळून पिकाच्या उत्पन्नाचा अचूक आणि विश्वासार्ह अंदाज निश्चित करणे’ होता
पीक तयार झाल्यानंतर आखलेल्या प्लॉटमधील सोयाबीनची काळजीपूर्वक कापणी करण्यात आली. त्यानंतर मळणी करून उत्पादनाचे वजन घेऊन ते अचूकपणे नोंदविण्यात आले. या प्रक्रियेद्वारे मिळणारा डेटा राज्यस्तरीय उत्पन्नाच्या अंदाजासाठी उपयोगी ठरणार आहे.
या वेळी उपस्थित अधिकारी आणि मान्यवर:
श्री. एम. आर. खैरनार – मंडळ कृषि अधिकारी, मंदाणा
श्री. जे. आर. शेख – उप कृषि अधिकारी, मंदाणा
श्री. बी. एन. करंजे – उप कृषि अधिकारी, मंदाणा
श्री. एच. एस. पावरा – सहाय्यक कृषि अधिकारी
श्री. हर्षल सोनवणे – विमा प्रतिनिधी
प्रगतशील शेतकरी श्री. देविदास रघुनाथ पाटील व इतर शेतकरी
या कापणी प्रयोगामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले तसेच कृषी खात्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्पन्न अंदाज प्रक्रियेबाबतची जाणीव वाढविण्यात आली.
.#नंदुरबारकृषिविभाग#सोयाबीनकापणी#पीककापणीप्रयोग#कृषीपर्यवेक्षण#NandurbarAgriculture#FarmYieldSurvey#SoybeanHarvest2025
