Home शहादा मिरची व केळी पीकावर चर्चासत्र संपन्न – शहादा येथे २०० हून अधिक...

मिरची व केळी पीकावर चर्चासत्र संपन्न – शहादा येथे २०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

Seminar on chilli and banana crops concluded – More than 200 farmers participated in Shahada

ठिकाण: एस. कुमार लॉन्स, शहादा

ग्रीन टीव्ही व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मिरची व केळी या महत्वाच्या पिकांवर केंद्रित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २०० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

मान्यवरांची उपस्थिती:

उपविभागीय कृषी अधिकारी के. एस. वसावे

वरिष्ठ शास्त्रज्ञ दहातोंडे सर, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा

गुळवे सर, पीक व्यवस्थापन विषयतज्ज्ञ

प्रा. चौधरी सर, मृदशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, लोणखेडा

जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME)

तंत्र अधिकारी गणेश सदगीर, व शहादा मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी

चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे:

1. मृदा व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन:

प्रा. चौधरी यांनी मिरची व केळी पिकासाठी मातीची तयारी, पोषण व्यवस्थापन व खतांचा संतुलित वापर यावर प्रकाश टाकला.

2. प्रश्नमंजुषा व बक्षीस वितरण:

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बरोबर उत्तरे देणाऱ्यांना ग्रीन टीव्हीमार्फत गौरवण्यात आले.

3. पीक व्यवस्थापन व प्रोसेसिंग:

गुळवे सरांनी पीक व्यवस्थापनाच्या तांत्रिक बाबी, तर दहातोंडे सरांनी केळी व मिरचीच्या बाजारपेठ व प्रक्रिया उद्योगावर सविस्तर माहिती दिली.

4. कृषी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन:

वसावे सरांनी पिक विमा योजना, पीक स्पर्धा, AgriStack Farmer ID, महाडिबीटी पोर्टलवरील योजना याविषयी माहिती दिली. यासोबतच महाडिबीटीवर प्रथम अर्ज करणाऱ्यांना मिळणाऱ्या प्राधान्याबाबतही मार्गदर्शन केले.

5. PMFME योजनेंतर्गत ३५% अनुदानासह मूल्यवर्धन प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी केळी उत्पादनात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रीन टीव्ही व कृषी विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

सुत्रसंचालन ग्रीन टीव्हीच्या अंशू मॅडम यांनी केले.

#कृषीविकास#pmfme#agristack#GreenTV#मिरची_केळी_चर्चासत्र#शहादा#nandurbaragriculture#FarmersEmpowerment

error: Content is protected !!
Exit mobile version