
या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य अशा पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककलांसह राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. नवरात्र थीमवर आधारित ३०० ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे अधिकृत संकेतस्थळ आणि युट्यूब चॅनेलवर (https://youtube.com/@MaharashtraTourismOfficial ) थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. याशिवाय, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा आणि मॅरेथॉन स्पर्धा, फॅम टूर, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल.
या महोत्सवामुळे तुळजापूर परिसरातील #नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, येरमाळा येथील #येडेश्वरी मंदिर आणि #परांडा किल्ला यांसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. यामुळे स्थानिक पर्यटनाला गती आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.