
निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी सैनिक कल्याण महामंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आयोजित बैठकीत दिले. बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या सेवेला न्याय मिळावा तसेच त्यांच्या कल्याणास प्राधान्य दिले जावे, या दृष्टीने शासन कटिबद्ध असून यासंदर्भात तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. माजी सैनिकांच्या सन्मान आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन ठाम असून या संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.