Home नंदुरबार जिल्हा श्री दत्तजयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरवात होत आहे.

श्री दत्तजयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरवात होत आहे.

The Sarangkheda Yatrotsav festival is beginning in Nandurbar district on the occasion of Shri Datta Jayanti.

सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभू यांच्या दर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यातून तसेच परिसरातून आणि गुजरात, मध्यप्रदेश या सिमेलगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर भाविकांच्या वाहनांमुळे तसेच इतर वाहनांमुळे सारंगखेडा परिसरात रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असतो. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीने रहदारी खोळंबली जाते. पर्यायाने त्याचा परिणाम आलेल्या भाविकांवर होत असतो. मागील इतिहास पाहता, यात्रा कालावधीत शहादा-दोंडाईचा रोडवर मोटार अपघात घडलेले आहेत. अवजड वाहनांच्या कोंडीमुळे भाविकांमध्ये धक्का-बुक्की, चेंगरा- चेंगरी किंवा वाहनांचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा प्राणहानी होणार नाही याकरिता अनरद बारी ते सारंगखेडा तापी पूल दरम्यान श्री दत्तजयंती उत्सव कालावधीत अवजड वाहनांचे वाहतुकीतील मार्गात दिनांक १४ डिसेंबर २०४ ते ०५ जानेवारी २०२५ या कालावधी करिता खालील प्रमाणे बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

१) दोंडाईचाकडून शहादामार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरुन नंदुरबार- प्रकाशामार्गे

२) गुजरात राज्याकडून अक्कलकुवा-तळोदा मार्गे येणारी अवजड वाहने प्रकाशा पुलावरुन नंदुरबार मार्गे दोंडाईचाकडे.

३) शहादाकडून दोंडाईचाहून जाणारी अवजड वाहने शहादा-अनरद बारी, शिरपूरमार्गे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी अनरदबारी मार्गे शहादा.

error: Content is protected !!
Exit mobile version