Home क्रीडा सारथी आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान...

सारथी आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान सोहळा

1
Felicitation ceremony for students and parents who achieved success in various competitive examinations organized by SARTHI.

सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या परीक्षेत १४०, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १ हजार १२४ आणि बँकिंग क्षेत्रात ५०० हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी

विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांतून १३ हजारांहून अधिक युवक रोजगारक्षम होऊन दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ.

मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन पैलूंवर आधारित धोरण राबविण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला गेला.

मोठ्या शहरात होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येण्यासाठी वासतिगृह आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू करुन विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयापर्यंत आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात.

उद्योजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ गतिमान करुन व्याज सवलत सुरू.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, पीएच.डी., कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी सारथीचे प्रभावी काम

केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावे

ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत मोठे परिवर्तन होणार असून त्यासाठी आवश्यक ड्रोन पायलट प्रशिक्षणही सारथीमार्फत सुरू

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर येथे सारथीची विभागीय केंद्रे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे काम सुरू

एमपीएससी परीक्षा वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेण्यावर शासनाचा भर. परीक्षांमध्ये ऑनलाईन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.

स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेने पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलेल

सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यालये एकत्र आणून विद्यार्थी आणि युवकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सुरु.