Home आरोग्य सामान्य रुग्णालय येथे रजोनिवृत्ती क्लिनीकचा शुभारंभ

सामान्य रुग्णालय येथे रजोनिवृत्ती क्लिनीकचा शुभारंभ

Menopause clinic launched at General Hospital

वर्धा : सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दि.14 जानेवारी रोजी विशेष रजोनिवृत्ती क्लिनीक (Menopause Clinic) सुरु करण्यात आले आहे.

या क्लिनीकचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कल्पना सुनतकरी व सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या क्लिनीकमध्ये स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन, आहार, जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरीत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने रजोनिवृत्ती क्लिनीक सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. सुमंत वाघ यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version