Home नंदुरबार नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३० वा,...

नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३० वा, देशात ५७ वा क्रमांक

Nandurbar Municipal Council's remarkable performance in Swachh Survekshan 2024-25 – 30th in the state, 57th in the country

(नंदुरबार) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये नंदुरबार नगरपरिषदेस राज्यात ३० वा व देशपातळीवर ५७ वा क्रमांक प्राप्त झाला असून, नाशिक विभागात ३ऱ्या क्रमांकाने नंदुरबारने आपले स्थान मजबूत केले आहे. विशेष म्हणजे, ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या गटात नंदुरबारची ही घौडदौड विशेष उल्लेखनीय मानली जात आहे.

*विविध उपक्रमांचा प्रभावी अंमलबजावणी:*

नंदुरबार नगरपरिषदेने मागील वर्षभरात स्वच्छतेसाठी राबवलेले विविध उपक्रम, जनजागृती मोहीम, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, वॉटर प्लस मानांकन, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये अनुकरणीय कामगिरी केली आहे.

शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी संस्था व नागरिकांचा स्वच्छतेसाठी मिळालेला सक्रिय सहभाग, तसेच प्रशासकीय यंत्रणेचे नियमित निरीक्षण, त्यातून वाढवलेली नागरिकांमधील सहभागाची पातळी या सर्व गोष्टींनी नंदुरबारला ‘हागणदारीमुक्त शहर’ आणि ‘कचरामुक्त शहर’ मानांकनात १ स्टारचा दर्जा मिळवून दिला आहे.

*पुरस्काराचे महत्त्व:*

नंदुरबार शहराने ६५ शहरांपैकी राज्यात ३० वा क्रमांक, तर देशातील 280 शहरांमधून ५७ वा क्रमांक मिळवला आहे. यामुळे नंदुरबारचा स्वच्छतेबाबतचा प्रयत्न आणि प्रशासनाची कार्यपद्धती राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

या यशानंतर आता नंदुरबार नगरपरिषदेचे लक्ष्य टॉप 10 मध्ये स्थान मिळवणे आहे. यासाठी लोकसहभाग वाढविणे, प्रत्येक घरातून कचरा वर्गीकरण, ओला कचरा व्यवस्थापन, स्वच्छ शौचालयांची उपलब्धता, स्मार्ट ड्रेनेज सिस्टीम यांसारख्या गोष्टींवर विशेष भर दिला जाणार आहे.

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य आणि सातत्याने घेतलेले प्रयत्न यामुळेच नंदुरबार शहराचा स्वच्छतेकडे वाटचाल करत असून हे यश सर्वांच्या सामूहिक कर्तृत्वाची साक्ष आहे.

#नंदुरबारस्वच्छतेकडे#स्वच्छसर्वेक्षण2025#स्वच्छभारतअभियान#NandurbarForCleanliness#UrbanDevelopmentSuccess#NandurbarMunicipalPride#WaterPlusCity#GarbageFreeStarCity#CitizenParticipation

error: Content is protected !!
Exit mobile version