प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास कार्यक्रम 2.0 अंतर्गत अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
ही बैठक मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा माहिती केंद्र, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत योजना 2.0 अंतर्गत विविध पाणलोट प्रकल्पांची प्रगती, अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, शाश्वत सिंचन विकासासाठी आवश्यकतेनुसार संसाधनांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी महोदयांनी योजनेच्या अंमलबजावणीत समन्वय, पारदर्शकता व वेळेत काम पूर्ण होणे या बाबींचे महत्व अधोरेखित केले आणि जिल्ह्यातील शेतीस अनुकूल जलसंधारण प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) पाणलोट विकास कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे अधिक उत्पादनासाठी अधिक पाणी वापर कार्यक्षमता, मृद व जलसंधारण सुधारणा, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. योजनेची यशस्वी अंमलबजावणी हे जिल्हा प्रशासनाचे वचनबद्ध उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.

#WatershedDevelopment#PMKrishiSinchanYojana#AgricultureGrowth