Home महाराष्ट्र लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा आढावा

लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा आढावा

Review of citizens' complaints on Democracy Day

(नंदुरबार) जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण 3 अर्जांचा आढावा घेण्यात आला.

संबंधित विभागांनी अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून विहित कालावधीत निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे प्रभावी आणि वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांना पारदर्शक, तत्पर आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

#लोकशाहीदिन#Nandurbar#DistrictAdministration#DrMittaliSethi#GoodGovernance#CitizenService#PublicGrievance#NandurbarDistrict#सुशासन#लोकाभिमुखप्रशासन

error: Content is protected !!
Exit mobile version