Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील निर्यात क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी…!

नंदुरबार जिल्ह्यातील निर्यात क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी…!

To give a new dimension to the export sector of Nandurbar district…!

आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय निर्यात प्रचालन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भूषवले.

व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती प्रणिता चौरे (अपेडा, कार्यालय मुंबई) यांनी कृषीपूरक आणि कृषीजन्य उत्पादनांसाठीच्या योजना सादर केल्या.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह के. बी. साळुखे यांनी पोस्टा मार्फत निर्यातीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

निर्यात कृती आराखड्यासंदर्भातील मार्गदर्शन करताना सुरज जाधव यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या निर्यात कृती आराखड्याचा आढावा सादर केला .

सनदी लेखापाल श्री. नेरपगार यांनी वित्तीय व्यवस्थापन आणि त्याचे फायदे याविषयी सखोल माहिती दिली.

जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी यावेळी निर्यात प्रचालन समितीच्या नियमित सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या असून, यामध्ये विदेश व्यापार महानिदेशालय, अपेडा, औद्योगिक संघटना, आणि निर्यात करणारे उद्योजक घटक यांनाही सहभागी करून घेण्याबाबत सांगितले.

हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देणारा ठरणार आहे.

#DistrictDevelopment#ExportPromotion#NandurbarRising#ApedaSupport#MakeInIndia#AgricultureToExports

error: Content is protected !!
Exit mobile version