Home महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर...

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Will discuss with the Chief Minister the land acquisition process for Shaktipeeth Highway in Parbhani district – Minister Chandrashekhar Bawankule

मुंबई : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयात दालनात परभणी जिल्ह्यातील महामार्गातील भूधारक शेतकऱ्यांची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. महामार्ग  भूसंपादन आणि मोजणी प्रक्रिया मध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत माहिती दिली.

हा महामार्ग महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जात असून यासाठी विविध जिल्ह्यातील मोजणी प्रक्रिया 60 ते 70 टक्के पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात भूसंपादनासाठी 90 टक्के मोजणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात गावातील बहुसंख्य जमीन ही शेतीसाठी लागवडीखालील असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन व मोजणीस विरोध आहे. याप्रसंगी खासदार जाधव यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मोजणी प्रक्रियेस होत असलेल्या विरोधाबाबत माहिती दिली. तसेच विविध शेतकरी यांनी आपली बाजू मंत्री बावनकुळे यांच्यासमोर सादर केली.

पागोटे ते चौक या एक्सप्रेस वे ला जोडणाऱ्या ग्रीन फील्ड कॅरिडोरची कामांना गती द्यावी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 पागोटे ते चौक हा ग्रीन फील्ड कॅरिडॉर वेगात पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली जावी. हा जोड रस्ता जेएनपीटी येथील पागोटे या गावापासून सुरू होत असून रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यातून 29 गावांमधून जात आहे उरण पनवेल व खालापूर या तालुक्यांमध्ये यासाठी सहा पूल व दोन टनेल याद्वारे 29 किलोमीटर लांबीच्या सहा लेन असलेला जोड  महामार्ग तयार होणार आहे.

यावेळी आमदार महेश बालदी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते तसेच राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य महाव्यवस्थापक संजय जयस्वाल, एनएएचआय चे अंशुमन गायकवाड दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version