Home शैक्षणिक दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन मेळावा; विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी

दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन मेळावा; विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी

0
Guidance seminar for audiovisual media courses; opportunity for skill development for students.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या प्रभादेवी येथील अकादमी संकुलात राज्य गणेशोत्सवाचे औचित्य साधून बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अकादमी संकुलात “दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमांचा मार्गदर्शनपर मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. दृकश्राव्य माध्यमातील ११ व्यावसायिक अल्पमुदतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या पहिल्या तुकडीचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे.

अतिशय माफक शुल्कात, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत. अकादमीच्या वतीने सर्व महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीकडून करण्यात आले आहे.