मत्स्यव्यवसायाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना महा-डीबीटी च्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून त्यांचा लाभ अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. भूजलाशयीन, निमखारे […]
मत्स्यव्यवसायाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – मंत्री नितेश राणे
Ensure the benefits of fisheries schemes reach the maximum number of beneficiaries – Minister Nitesh Rane

मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना महा-डीबीटी च्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून त्यांचा लाभ अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायासाठी मान्यता देण्यात आलेल्या २८ योजनांपैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि २ योजनांमध्ये सुधारणा अशा एकूण २४ योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

महा-डीबीटीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकांना कमीत कमी कागदपत्रांत योजनांचा लाभ मिळावा आणि ऑनलाइन प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: