Home शैक्षणिक UPSC-CSE मार्गदर्शनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची नवी दिशा!

UPSC-CSE मार्गदर्शनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची नवी दिशा!

0
A new direction towards administrative services for medical students through UPSC-CSE guidance!

(नंदुरबार) जन्नायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबारच्या विद्यार्थी परिषदेच्या वतीने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी UPSC-CSE मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 🎓

या कार्यक्रमात जिल्हाधिकारीडॉ. मित्ताली सेठी आणि परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज पटले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. निलेश तुमराम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

💡 डॉ. मित्ताली सेठी यांनी UPSC-CSE ही केवळ परीक्षा नसून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. समस्या सोडविताना तथ्य, उपलब्ध माहिती, नागरिकांच्या गरजा, प्रशासकीय मर्यादा आणि दीर्घकालीन परिणामांचा समतोल विचार करण्याचे महत्त्व त्यांनी अनुभवाधारित उदाहरणांतून स्पष्ट केले.

🩺 वैद्यकीय विद्यार्थ्यांची वैज्ञानिक विचारसरणी, संवादकौशल्य आणि समाजाशी असलेला प्रत्यक्ष संपर्क ही प्रशासकीय सेवेसाठी उपयुक्त कौशल्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

📚 डॉ. पंकज पटले यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी, चालू घडामोडी, उत्तरलेखन, वेळेचे नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले.

🙋‍♀️ विद्यार्थ्यांनी UPSC तयारी, मुलाखत, वैद्यकीय क्षेत्रातून नागरी सेवेत प्रवेश आणि प्रशासनातील डॉक्टरांची भूमिका याबाबत प्रश्न विचारले. मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली.

🌟वैद्यकीय ज्ञान + प्रशासकीय कौशल्य = व्यापक समाजसेवेची नवी संधी!