पॅकेजिंग व ब्रँडिंगच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना नवी दिशा!

(नंदुरबार) कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व सेल्को फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकरी व महिला उद्योजकांसाठी पॅकेजिंग व ब्रँडिंग विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी VTPN संस्थेचे संस्थापक रोहित ललवाणी यांनी योग्य पॅकेजिंग, आकर्षक ब्रँडिंग, उत्पादनाची बाजारपेठेत ओळख निर्माण करणे आणि ग्राहकांपर्यंत उत्पादन […]
पॅकेजिंग व ब्रँडिंगच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना नवी दिशा!
An effort to strengthen sports culture in schools through sports training for teachers.

(नंदुरबार) कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व सेल्को फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकरी व महिला उद्योजकांसाठी पॅकेजिंग व ब्रँडिंग विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. 💐

🎯 यावेळी VTPN संस्थेचे संस्थापक रोहित ललवाणी यांनी योग्य पॅकेजिंग, आकर्षक ब्रँडिंग, उत्पादनाची बाजारपेठेत ओळख निर्माण करणे आणि ग्राहकांपर्यंत उत्पादन प्रभावीपणे पोहोचविणे याबाबत मार्गदर्शन केले.

💻 तसेच बिझनेस अकाउंट सुरू करणे, वेबसाइटचा व्यवसायासाठी प्रभावी वापर, डिजिटल माध्यमातून उत्पादनांचा प्रचार व विक्री वाढविणे याबाबतही माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील स्थानिक उत्पादनांना योग्य ब्रँडिंगच्या माध्यमातून मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले.

🌾 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी उपस्थित उद्योजकांना शुभेच्छा देत, “नंदुरबार जिल्ह्यासाठी पॅकेजिंग आणि ब्रँडिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. स्थानिक उत्पादने अधिक प्रभावीपणे बाजारपेठेत पोहोचावीत यासाठी पुढील काळातही काम करण्यात येईल. यासाठी ‘रूरल मार्ट’ सुरू करण्याची संकल्पना विचाराधीन आहे,असे नमूद केले.

🤝 या उपक्रमामुळे महिला व ग्रामीण उद्योजकांना आपल्या उत्पादनांना नवी ओळख देण्यासोबतच बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: