वनहक्क समितीसमोर ३५० वनदाव्यांची सुनावणी

नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी **जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी तळोदा येथील याहामोगी सभागृहात घेण्यात आली.
वनहक्क समितीसमोर ३५० वनदाव्यांची सुनावणी
hearing-on-350-forest-claims-before-forest-rights-committee
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत एकूण ३५० वनदाव्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी दावेदारांचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रे व नोंदींची तपासणी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, संजय पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, अशासकीय सदस्य कांतीलाल पाडवी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व वनहक्क दावेदार उपस्थित होते.
वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: