नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय सभा; सेवा संकल्प अभियान, दुष्काळ उपाययोजना व विकासकामांचा आढावा
बैठकीत जिल्हास्तरावरील विविध विभागांचे खाते प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर तालुका व गट स्तरावरील गट विकास अधिकारी (BDO) आणि इतर क्षेत्रीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) सहभागी झाले होते.
बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि आढावा:
• सेवा संकल्प अभियान-२०२६: अभियानाच्या पहिल्या सप्ताहात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, शाळा, आंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) स्तरावर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
• दुष्काळ निवारण व टंचाई उपाययोजना:
o पशुधन, चारा व पाणी : पशुसंवर्धन, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत चारा टंचाई, पिण्याचे पाणी आणि सिंचन विहीर यावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यांत आली.
• घरकुल योजना (DRDA): केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत् प्रधानमंत्री आवास, शबरी व रमाई घरकुल योजनेच्या प्रगतीचा आर्थिक व भौतिक आढावा.
• मनरेगा (MGNREGA): महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, मजूर उपस्थिती, तसेच कुशल व अकुशल मजुर व पुर्ण अपुर्ण कामांचा आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा आढावा.
• स्वच्छ भारत अभियान: घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या कामाचा सविस्तर आढावा.
• निधी व निधी खर्चाचा आढावा (आर्थिक आढावा): जिल्हा परिषद नंदुरबार सेस, जिल्हा नियोजन समिती (DPDC) व इतर शासन अनुदानांतर्गत प्राप्त निधी, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश (Work Orders), तसेच लेखाशीर्षनिहाय प्राप्त अनुदान व खर्चाचा आढावा घेण्यांत येऊन विकास कामे विहीत वेळेत गुणवत्ता पुर्वक पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
उपस्थिती:
या समन्वय सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्यासह:
• चंद्रकांत पवार – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
• गणेश मोरे – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)
• प्रविण देवरे – मुख्य लेखा व वित्त अधिकारी
• उदयकुमार कुसुरकर – उप मुख्य कार्यकारी अधिकारी
• अजय पाटील – कार्यकारी अभियंता
• क्रांती आसुर्डे – शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खातेप्रमुख आणि तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

