घोटाणे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात; भटक्या-विमुक्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ
(नंदुरबार) ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रपिता राष्ट्रनेता अभियान’ अंतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान मौजे घोटाणे येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजना, दाखले व प्रमाणपत्रांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.
या शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा १ लाभार्थी तसेच विविध प्रमाणपत्रांमध्ये उत्पन्न दाखले २, शिधापत्रिका १३, जात प्रमाणपत्र ७, जन्म-मृत्यू दाखले ४, विवाह प्रमाणपत्र ४ व इतर प्रमाणपत्रे ७ अशा स्वरूपात लाभ देण्यात आला.
शिबिराच्या माध्यमातून एकूण ६० नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रशासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उपक्रमाला घोटाणे येथे मिळालेला प्रतिसाद निश्चितच उत्साहपुर्वक ठरला.
Follow Us:

