वन्याविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण; आरोग्यसेवा अधिक सुरळीत होण्यास मदत
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करण्याच्या उपक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील वन्याविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राला SELCO संस्थेमार्फत सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सौरऊर्जा प्रणालीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सौरऊर्जा प्रणालीमुळे आरोग्य केंद्रातील वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले.
यापूर्वी वीज उपलब्धतेअभावी आरोग्यसेवेत अडचणी निर्माण होत होत्या. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे आता आवश्यक वीज उपलब्ध होत असून, विविध आरोग्य सेवा, उपकरणे आणि दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यास मदत होत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सुविधांना शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने SELCO संस्थेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
शाश्वत ऊर्जा, सक्षम आरोग्यसेवा आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न!
Follow Us:

