सेवा संकल्प अभियानांतर्गत दामिनी पथकाकडून महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन

(नंदुरबार) सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, शहादा येथे दामिनी पथक, नंदुरबार यांच्यावतीने महिला सुरक्षा, महिलांशी संबंधित कायदे तसेच स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत दामिनी पथकाकडून महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन
seva-sankalp-abhiyan-damini-pathak-women-safety-guidance
           यावेळी दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध कायदे, लैंगिक छळापासून संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, सायबर गुन्हे तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत माहिती दिली. कोणतीही अनुचित घटना घडल्यास घाबरून न जाता तत्काळ पालक, शिक्षक, वसतिगृह प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
            आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय यंत्रणा व तक्रार निवारणाच्या माध्यमांची माहिती देत, आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सुरक्षा, कायदेविषयक जागरूकता, जबाबदार वर्तन आणि सुरक्षित समाजनिर्मितीबाबत जनजागृती होत आहे. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: