वाण्याविहीर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी; कपाशी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली.
- यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कपाशी पिकाची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यात आली.
- कपाशी पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
- शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत त्यांना आवश्यक शासकीय मदत व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी
- करून तातडीने उपाययोजना करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
Follow Us:

