अक्कलकुवा तालुक्यात वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू; एक बैल गंभीर जखमी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, देवबारीपाडा येथील बाड्या रान्या तडवी यांनी आपल्या अंगणातील झाडाजवळ तीन बैल बांधले होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा बैल गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
बैल हे शेतीकामासाठी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे साधन असल्याने दोन बैलांचा मृत्यू आणि एका बैलाला झालेली गंभीर दुखापत याचा आगामी खरीप हंगामातील शेतीकामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पशुधनाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

