बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखला तयार करून अंगणवाडी सेविका पदासाठी केलेला अर्ज रद्द
अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथील शर्मिलाबाई ईश्वर वळवी या महिलेने बनावट कागदपत्र सादर करून धनखडी येथील रहिवासी असल्याचा दाखला जोडून अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज सादर केला आहे या अर्जावर हरकत घेत धनखेडी येथील रहिवासी शकीलाबाई रूपसिंग वसावे यांनी शर्मिलाबाई ईश्वर वळवी यांचा बनावट कागदपत्रांच्या आधारे सादर केलेला अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज रद्द करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबत निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचाही आरोप निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनावर निमजी दमण्या वसावे, गुलाबसिंग खुमा वसावे, कांतीलाल उदेसिंग वसावे ,जेंती निमजी वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान,याबाबत शकीलाबाई रूपसिंग वसावे यांनी 26 ऑक्टोंबर 2026 रोजी पिंपळखुंटा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.

