राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; शहादा तालुक्यात १.४५ कोटींची अवैध दारू पकडली
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील राणीपूर रोडवरील एका गोडाऊनवर नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला.
- जप्त मुद्देमाल: या कारवाईत १ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘रॉयल ब्लू व्हिस्की’ आणि ‘ऑक्सिजन व्होडका’चे एकूण १,४८६ खोके हस्तगत करण्यात आले.
- गुन्हा दाखल: याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कारवाई करणारे पथक: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, आणि उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक केशव राऊत, निरीक्षक आर. के. सकपाळ आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी केली.
Follow Us:

