शस्त्रास्त्रांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ११ आरोपींना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
(नंदुरबार) पोलिसांच्या पथकाने या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ गावठी कट्टे आणि ४६ जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. जप्त केलेल्या या शस्त्रास्त्रांची किंमत १३ लाख ९७ हजार रुपये आहे.
- तस्करीचे जाळे: मुख्य संशयित आरोपी पृथ्वीराज उर्फ गोलू हा मध्य प्रदेश राज्यातून अवैध गावठी बनावटीचे लोखंडी कट्टे आणून महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे तसेच गुजरात राज्यात तस्करी करत होता.
- कारवाईचे नेतृत्व: जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Follow Us:

