आडगाव आरोग्य केंद्रात रुग्णसेवा पूर्ववत

शहादा तालुक्यातील आडगाव येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या मातेला दाखल करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, प्रशासनाने दखल घेत येथील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू केली आहे.
आडगाव आरोग्य केंद्रात रुग्णसेवा पूर्ववत
health-workers-protest-suspended-after-two-days
  • घटना: खरगोन येथील एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी आडगाव आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार देण्यास नकार देण्यात आला होता. यामुळे तिच्या नातेवाइकांची धावपळ झाली आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
  • प्रशासकीय दखल: ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांनी तातधील आडगाव केंद्राला भेट देऊन ग्रामस्थ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर येथील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू झाली.
  • प्रसूती कक्ष स्वच्छ करण्याचे आदेश: तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसूती कक्ष तातडीने स्वच्छ व निर्जंतुक करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय किंवा रुग्णांची हेळसांड होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  • लोकप्रतिनिधींकडून दखल: आमदार राजेश पाडवी यांनीही या प्रकरणाची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीसह सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: