अक्कलकुवा जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तिच्या सुरक्षितता व आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांसह वॉर्डन, स्टाफ नर्स आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापक विलास मच्छिंद्र पाटील, वॉर्डन प्रियंका वसावे, स्टाफ नर्स भानुप्रिया शेट्टी तसेच अन्य तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर विद्यालय प्रशासनाकडून झालेल्या संभाव्य निष्काळजीपणाची तसेच संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

