नंदुरबार विकास शिखर परिषद २०२६ साठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार विकास शिखर परिषद २०२६ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने परिषदेचे संयोजक व योजक डॉ. गजानन डांगे यांनी परिषदेची संकल्पना, उद्दिष्टे तसेच परिषदेसाठी विविध समाजघटकांसोबत सुरू असलेल्या बैठका व चर्चासत्रांची माहिती दिली.
तसेच परिषदेसाठी तयार करण्यात येत असलेले विविध अहवाल, प्रपत्रे आणि विकासविषयक माहितीचे संकलन याबाबतही सविस्तर आढावा सादर करण्यात आला.
‘आकांक्षित जिल्ह्याकडून प्रगतिशील जिल्ह्याकडे’ नंदुरबारची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासन आणि समाजातील विविध घटकांच्या समन्वयातून विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.
नंदुरबार विकास शिखर परिषद २०२६ साठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी व्यक्त केला.
समन्वय, सहभाग आणि विकासाच्या सामूहिक प्रयत्नांतून नंदुरबारच्या प्रगतिशील वाटचालीला नवी दिशा!
Follow Us:

