नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ मदत कक्ष स्थापन ;नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ मदत कक्ष स्थापन ;
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे, आवश्यक माहिती देणे तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ‘जिल्हा दुष्काळ मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशा संघवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दुष्काळाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व मागण्या नोंदवून त्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी हा मदत कक्ष कार्यरत राहणार आहे. दुष्काळाशी संबंधित कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास नागरिकांनी जिल्हा दुष्काळ मदत कक्ष क्रमांक 02564-210006 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशा संघवी यांनी केले आहे.
Follow Us:

