सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

(नंदुरबार) शासनाच्या विविध योजना व आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत शहादा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात रोजी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
seva-sankalp-abhiyan-maz-gav-arogyasampanna-gav-workshop
        या कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गुलाले यांनी अभियानाची उद्दिष्टे, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध विभागांच्या समन्वयातून गावांना आरोग्यसंपन्न बनविण्यावर भर देण्यात आला.
कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: