सहकार मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील शेतकरी उपोषण मागे
राष्ट्रीय मराठा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी संवेदनशीलतेने चर्चा करून आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सध्या राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र, वाढते वय आणि शेतीच्या कामांमुळे हाताचे ठसे झिजल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर हा विषय मांडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. सहकार मंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर अंकुशराव पाटील होनाळकर यांनी उपोषण थांबवत असल्याचे जाहीर केले.
Follow Us:

